नाभिक समाजाला व्यवसायाची परवानगी देण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । मागील दीड वर्षापासुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या शेकडो नाभिक समाजावर हालाकीचीचे प्रसंग ओढवले गेले असून बेरोजगार झालेल्या नाभिक समाजाला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आज यावल येथील श्री जिवा महाले नाभिक बहुऊदेशीय संस्थेच्या माध्यमातुन तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

या संदर्भात श्री जिवा महाले नाभिक बहुऊदेशीय संस्थाच्या वतीने देण्यात आलेल्या लिखित निवेदनात म्हटले आहे की , राज्यात मागील दिड वर्षांपासुन सर्वत्र कोरोना संसर्गामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणुन लॉकडाऊन लावण्यात आले असुन, यामुळे सर्व व्यवसाय सोबत नाभिक समाजाचा व्यवसाय देखील बंद झाला असुन यामुळे समाज बांधवांनी आपला परिवाराचे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न पडला असुन, नाभिक समाजापुढे दुसरे रोजगाराचे साधन नाही , समाजाचा सलुन चालविणे हा जन्मजात व्यवसाय असल्यामुळे समाजा समोर पर्याय नाही. जळगाव जिल्ह्याच्या नाशिक, पुणे आणी मध्यप्रदेश सारख्या राज्यात आमच्या व्यवसायाला शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. मग जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाजाला सलुन व्यवसायाची परवानगी का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

बेरोजगारीमुळे व रोजगार अभावी आर्थिक संकटात सापडलेल्या समाजाची सहनशक्ती संपली असुन सयंम ही सुटले असुन समाज बांधवांसमोर आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही अन्यथा जिव वाचविण्यासाठी आंदोलनाचा दुसरा पर्याय नसल्याने जिल्हाधिकारी हे आमचे पालक असुन त्यांनी आमच्या समाजावर अन्याय होणार नाही, अशी पालकतत्व कर्तव्याची जाणीव ठेवुन आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी , सुपडु वारूळकर , रविन्द्र आमोदेकर , सुरेश चौधरी, अंनतारे चौधरी , राहुल चौधरी , शेख सलीम शेख शरीफ, दिलीप चौधरी, सुनिल संनसे, रणजित ठाकरे, सुरेश चौधरी यांच्या स्वाक्षरी आहे.

 

Protected Content