भुसावळात सुनेने केला सासूचा खून; परिसरात खळबळ

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील गजानन महाराज नगर भागातील महिला कोटेजा विद्यालयातील वॉचमन यांच्या आईच्या मानेवर सुनेने लोखंडी विळ्याने वार करून खून केल्याची घटना आज सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली  आहे.

अधिक माहिती अशी की, पद्माबाई विद्यालय  प्राथमिक व बालवाडी विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय गजानन महाराज नगर भागातील महिला कोटीच्या विद्यालयात ८ वर्षापासून वाचमेन नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे व त्यांची पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे परिवार होता.

आज २ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सुमारास रवींद्र सोनवणे हा किराणा दुकानावर माल खरेदी करण्यासाठी गेला. रविंद्र सोनवणे यांची पत्नी उज्वला रविंद्र सोनवणे यांची व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात वाद झाला. तो विकोपास जाऊन उज्वला सोनवणे यांनी धारदार शस्त्र विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून ठार केले. ही घटना ६.४० वाजेच्या सुमारास घडली.

खूनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी नितीन गणापुरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सपोनि संदीप दूनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे, पोलीस कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी उपस्थित होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.