परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा सतर्क

परभणी । येथील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूनेच झाल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली असून यामुळे राज्यात या रोगाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मयत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. येथून हे नमूने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या तपासणीच्या अहवालात या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मृत पावलेल्या त्या ८०० कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई उद्या अर्थात मंगळवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

Protected Content