‘ती’ फाईल उघडल्यास नितेश राणे जेलमध्ये जाणार ! : राऊतांचा गौप्यस्फोट

सिंधूदुर्ग प्रतिनिधी । नितेश राणे यांनी एकाची १२ कोटींमध्ये फसवणूक केली असून फडणवीस त्यांना तुरूंगात टाकण्याच्या तयारीत होते…ही फाईल पुन्हा उघडली तर राणे जेलमध्ये जाऊ शकतात असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

कणकवली येथील एका कार्यक्रमात विनायक राऊत यांनी नितेश राणेंबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. याप्रसंगी ते म्हणाले की, नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपमध्ये गेल्याने हे प्रकरण थांबले. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसर्‍याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी नारायण राणे दोन महिन्यांपूर्वी दिवसातून तीन-तीन वेळा मातोश्रीवर फोन करत होते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Protected Content