बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करा — पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

 

मुंबई, वृत्तसंस्था ।महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी चिकन, अंडी खाणार असाल तर ७० डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्यातील जनतेला दिला आहे. यासोबतच त्यांनी बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सुनील केदार यांनी बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला दिला. राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. फक्त ७० ते ८० डिग्री तापमानावर अर्धा तास चिकन- अंडी शिजवा आणि त्यानंतर खा. अर्धा तास चिकन- अंडी शिजवल्यास त्यातील जीवाणू मरून जातात. हे मी सांगत नाही तर संशोधनातून तसं सिद्ध झालं आहे, असं केदार यांनी सांगितलं.

Protected Content