आम्ही तिघांनाच राजे मानतो – प्रकाश आंबेडकर

 

मुंबई । राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत; असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

 मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले आमनेसामने आले आहेत. या नंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले की, राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

 

Protected Content