रायपूर येथे झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर कारवाई; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर गावात काही जण प्राथमिक शाळेच्या भिंतीच्या आडोशाला बसून झन्ना मन्ना खेळणार्‍यांवर एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकली. यात १ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील रायपूर येथील प्राथमिक शाळेच्या भितींच्या आडोशाल काही जण झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. सचिन मुंढे, चंद्रमोहन सोनवणे, सतिष गर्जे यांचे पथक तयार करुन त्यांनी जुगार खेळणार्‍यांवर धाड टाकली. यामध्ये विशाल भागवत सुरवाडे (२५) रा. रायपूर, धनसिंग भोंदू राठोड (३५) रा. सुप्रिम कॉलनी, राकेश संजय पाटील (२७) रा. दत्तमंदिर कुसूंबा, गणेश शिवाजी शिंदे (२७) रा. बस स्टॉप कुसूंबा, दिनेश भास्कर खैरनार (२२) रा. कुसूंबा यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content