राज्यात २६ फेब्रुवारी पासून मराठा आरक्षण लागू होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेला होता. आता राज्यात २६ फेब्रुवारी पासून मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे नोकऱ्या आणि शैक्षणिक सवलतीमध्ये मराठा समाजाल १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी करून आता मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाची राजपत्रही काढण्यात आला आहे. राज्यातील जुन्या शासकीय नोकरभरतीत हा आरक्षण लागू नसेल पण २६ फेब्रुवारी नंतर निघाणाऱ्या शासकीय नोकर भरतीमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के जागा आरक्षित असतील.

एकीकडे मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सगेसोयरे आणि ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहे. याप्रकरणी विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content