मुख्यमंत्र्यांनी सकल राजपुत समाजाला फसवले म्हणून पाचोऱ्यात आमरण उपोषण सुरू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सकल राजपुत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात औरंगाबादच्या सभेत आश्वासन दिले त्यानंतर जळगाव उपोषणच्या वेळी मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून पुन्हा पाचोर्यात राजपुत समाजाचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. औरंगाबाद येथील सकल राजपुत समाजाचे महाधिवेशनाला देशाचे संरक्षण मंत्री  राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह असंख्य मंत्री मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते. यावेळी राजपुत समाजाचे महामंडळ सह विविध मागण्यांसंदर्भात पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते सरकार ने केले नाही म्हणून सकल राजपुत समाजाने जळगाव येथे २ ऑक्टोबर रोजी राजपुत समाजाने पुन्हा आमरण उपोषण सुरू केले होते.

यावेळी आ किशोर पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल करुन आठ दिवसांत राजपुत महामंडळ ची निर्मिती होईल या आशेवर उपोषण सोडण्यात आले होते. मात्र तब्बल चार महिने उलटले तरी कोणत्याही मागणी पुर्ण न झाल्याने अखेर सकल राजपुत समाजाचे आमरण उपोषण गिरीश परदेशी यांनी सुरु केले असून यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पप्पू राजपूत, करणी सेना तालुका अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत, विलास राजपूत सुवर्णा राजपूत, दीपक राजपूत, सुनील राजपूत,, देविदास पाटील, जयराम पाटील, प्रकाश पाटील, शिवराम राजपुत, ज्ञानू राजपूत विजय राजपूत, राजेंद्र राजपूत, विनोद राऊत, विजय पाटील, रामकृष्ण पाटील, गौरव पाटील, दिलीप राऊत, गणेश देशमुख, मनोहर पाटील आदी उपस्थित होते. या उपोषणाच्या प्रमुख मागण्या मध्ये भामटा राजपुत चे प्रमाण पत्र सुरळीत मिळावे, वस्तीगृह सह विरशोमणी महाराणा प्रताप जंयती शासकीय सुटी जाहीर करा

Protected Content