पाचोऱ्यात शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन (व्हिडिओ )

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  पाचोरा – भडगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल -डिझेल दरवाढ विरोधात जाहीर निषेध करण्यात आला.  शहरातील शिवसेना कार्यालयापासुन बैलगाडीवर बसुन तहसील कार्यालयापर्यंत प्रवास करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. 

जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख अंजली नाईक, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनिता किशोर पाटील, वैशाली सुर्यवंशी, प्रा. अस्मिता पाटील, मंदाकिनी पाटील, किरण पाटील, बेबा पाटील, सुशिला पाटील, जया पवार, शुष्मा पाटील, सुरेखा वाघ (भडगाव), उर्मिला शेळके सह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शहरातील शिवसेना कार्यालयापासुन महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध नोंदवित तहसिलदार कार्यालयात येऊन तहसिलदार कैलास चावडे यांना जाहिर निषेधाचे निवेदन दिले. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी – धंदयावर गदा आली, रोजगार बुडाले, संसार कसा चालवावा असा यक्ष प्रश्न ? जनताजनार्दनास पडला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन सतत पेट्रोल – डिझेल दरवाढ सुरुच आहे. यामुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाला  जगाव की मराव, अशी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.  पेट्रोल- डिझेल दरवाढीने शंभरी गाठलेली आहे. त्यामुळे दळणवळण महागले. प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली, जनतेला स्वस्त, मुबलक जिवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र भाजपा प्रणित मोदी सरकारची निती ही भांडवलदारांची आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही घेणे नाही. जनता मात्र महागाईच्या वजनात होरपळून निघत आहे. हे शिवसेना कदापी सहन करणार नाही. याकरिता शिवसेना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी राहील. मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असुन पेट्रोल डिझेल दरवाढ तातडीने मागे घ्यावी. महागाईला आळा घालावा, अन्यथा  पाचोरा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी अंजली नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला. याप्रसंगी युवानेते सुमित किशोर पाटील, शहराध्यक्ष किशोर पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, नगरसेवक शरद पाटे, पप्पु राजपुत, संदिपराजे पाटील, नाना वाघ, विजय भोई, जावेद शेख, विशाल राजपुत, सागर पाटील, मल्हारी पाटील, सुरज जगताप, भुषण पाटील, विजय पाटील उपस्थित होते.     

   

 

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/163529622201159

 

Protected Content