सबॉर्डिनेट इंजिनिअर्स आक्रमक : ६ सप्टेंबरला होणार काम बंद (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपनीतील सबॉर्डिनेट अभियंते मागील अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु,प्रशासनाने याची दखल न घेतल्याने   महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमधील सर्व अभियंत्यांनी दि. २३ पासून आंदोलनाला सुरुवात केली. आज द्वारसभा घेवून निषेध नोंदविण्यात आला. 

 

महापारेषण कंपनी प्रशासनामार्फत स्टाफ सेटअपच्या नावाखाली अभियंत्यांची पदे कमी करण्याचा, महावितरणमार्फत कम्पलसरी व्हॅकन्सी (CV) च्या नावाखाली रिक्त पदे न भरणे, महानिर्मितीमधील फॅक्टरी अलाउन्स लागू न करण्याचा घाट घातलेला आहे.  सदर विषयात संघटनेने मागील २ वर्षांपासून प्रशासनासोबत चर्चा करुन लेखी निवेदन देखील दिलेले आहे. तरीदेखील तीनही कंपनीच्या प्रशासनाने संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय लादलेला आहे म्हणून राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याची वेळ आलेली आहे असे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अभि. पराग चौधरी यांनी जळगाव येथील द्वारसभेला संबोधित करतांना म्हटले.

महापारेषणमधील अन्यायकारक स्टाफ सेटअपमुळे ५०७ उपकार्यकारी अभियंता तसेच १४० अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची पदे कमी होणार आहेत. महावितरणमधील कम्पलसरी व्हॅकन्सी (CV) मुळे अभियंत्यांवर कामाचा प्रचंड अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे स्वास्थ्यावर परिणाम होऊन अभियंते व्याधिग्रस्त होत आहेत अशी माहिती सहसचिव अभि. कुंदन भंगाळे यांनी दिली. मंडळ सचिव देवेंद्र भंगाळे यांनी सनदशीर मार्गाने सामाजिक व अत्यावश्यक सेवेचे भान ठेऊन आंदोलन करणारे संघटन असल्याचे सांगून प्रास्ताविक केले. द्वारसभेला सहसचिव योगेश भंगाळे, महापारेषणचे सहसचिव अभि. गणेश वराडे, मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, विभागीय अध्यक्ष एस. डी. चौधरी, देवेंद्र सिडाम, पंकज बाविस्कर, विभागीय सचिव मिलिंद इंगळे, विशाल आंधळे, हेमंत खांडेकर, विकास कोळंबे, अभि. गिरीश चौधरी, मयूर भंगाळे, शैलेश चौधरी, अमोल पाटील, संजय वाघ यांचेसह महापारेषण व महावितरणचे अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख मागण्या :  महापारेषण मधील स्टाफ सेटअप लागू न करणे,  महावितरण मधील CV अर्थात कम्पलसरी व्हॅकन्सी (अनिवार्य रिक्त पदे) धोरण रद्द करणे,  महानिर्मिती मधील फॅक्टरी अलाउन्स लागू करणे,, महापारेषणमध्ये २०१५ पासून तसेच महावितरण व महानिर्मिती मध्ये २ वर्षांपासून न झालेल्या पदोन्नती त्वरीत करणे.  एकतर्फी लागू केलेले सेवा विनियम व बदली धोरण रद्द करणे.  नवीन पद भरती ताबडतोब करणे. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/562122195213307

 

Protected Content