काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची नावे जाहीर; खान्देशातून के.सी. पाडवींना संधी

congress logo

मुंबई प्रतिनिधी । उध्दव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले असून यात खान्देशातून के.सी. पाडवी यांना संधी मिळाली आहे.

उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांच्यासह प्रारंभी तिन्ही घटक पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर आज दुपारी उर्वरित मंत्री शपथ घेणार आहेत. यात काँग्रेसतर्फे दहा मंत्री शपथ घेणार आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, के.सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख या नेत्यांची कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. तसेच सतेज पाटील, विश्‍वजीत कदम राज्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे. काँग्रेसच्या मंत्रिमंडळाच्या यादीत दहापैकी चार कॅबिनेट मंत्री विदर्भाचे असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. तर खान्देशातून के. सी. पाडवी यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

Protected Content