आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथीची प्रवेश पूर्व‎परीक्षा हिंदी भाषेतूनही देता येणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध ‎‎आणि होमिओपॅथी अर्थात आयुष ‎‎अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर व पदवी ‎‎अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य असलेली ‎‎आयुष-पीजी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली ‎जाणार आहे. त्यासाठी ३१ जुलै पर्यंत‎ इंटर्नशिप पूर्ण केलेले विद्यार्थीच पात्र ठरणार ‎‎आहेत. आयुष पीजीसाठी विविध भाषांतून परीक्षा ‎देण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली‎ आहे.
त्यानुसार आयुर्वेदाचा पेपर हा इंग्रजी‎ आणि हिंदीतून होईल. होमिओपॅथी केवळ‎ इंग्रजी, सिद्ध इंग्रजीतून आणि तामिळ व ‎युनानीचा पेपर इंग्रजी आणि उर्दूत देण्याची‎ संधी दिली आहे.‎ पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेत‎ परीक्षा देण्याची संधी मिळत असल्याने‎ विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या‎ परिक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी‎ विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट‎ द्यावी.‎

Protected Content