केंद्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर

bodaval

 

बोदवड प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नुकत्याच झालेल्या आत्मसन्मान अभ्यासिकेत केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली यांच्यावतीने बोदवड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

प्रारंभी जिल्हा सचिव राजेश पोतदार यांनी प्रास्ताविकात संघटनेबद्दल माहिती दिली. तसेच संघटनेचे उद्देश, संघटनेचा विस्तार व आगामी उपक्रम, मानवाचे अधिकार, त्यांचे हनन, समाजातील व्यसनाधिनता, बालकामगारांची समस्या, बेरोजगारी यावर संघटनेकडून केल्या जात असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. प्रसंगी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुरेश वराडे यांनी संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. केंद्रीय संघटक शिवचरण उज्जैनकर यांनी संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देत विविध शाळा, महाविद्यालयांमधून समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी बोदवड तालुका कार्यकारणी जिल्हा संघटक प्रा.बी.जी.माळी यांनी जाहीर केली.

कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष डॉ. संजय शुरपाटणे, उपाध्यक्ष रवींद्र मराठे, सचिव प्राचार्य सुरेश वराडे, कार्याध्यक्ष विजय प्रकाश माळी, निलेश भाऊराव पाटील, कोषाध्यक्ष सुभाष शुरपाटणे, सहसचिव नईमखान बागवान, हर्षल कैलास बडगुजर, संघटक सचिव शांताराम कोळी, बी. डी. इंगळे, कायदेशीर सल्लागार ऍड. ईश्वर पाटील, ऍड. अर्जुन पाटील, प्रसिद्धीप्रमुख संदीप मधुकर वैष्णव, गोपीचंद सुरवाडे, अमोल आमोदकर, सदस्य रामचंद्र बाजोळे, सुधाकर तायडे, सुरेश उज्जैनकर, महासेन सुरळकर आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

उपस्थिती आणि सत्कार
अध्यक्षस्थानी केंद्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर होते. तर व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जि.प. सदस्य रामदास पाटील, जिल्हासचिव राजेश पोतदार, जिल्हा संघटक प्रा.बी.जी.माळी, प्राचार्य डॉ.सुरेश वराडे, पुरुषोत्तम गड्डम, उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आभार नवनियुक्त तालुकाध्यक्ष डॉ. संजय शुरपाटणे यांनी मानले. यावेळी ताराचंद साकला, ज्ञानेश्वर घोगले, शांताराम रामकृष्ण कोळी आदि मान्यवर उपस्थित होते.

Protected Content