भुसावळात ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन

Inauguration of customer guidance service center in Bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । ग्राहकांना जागरूक करण्यासाठी, ग्राहक व सामान्य नागरिकांना न्याय मिळण्याकरिता शासनाचे दूत म्हणून अ.भा.ग्राहक पंचायत कार्य करीत आहे. या अंतर्गत अ.भा.ग्राहक पंचायत भुसावळ तालुक्याच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

ग्राहकाच्या शोषणाला ग्राहक काही अशी जबाबदार असतो त्याकरीता ग्राहकाला एक दृष्टी देण्याची जबाबदारी अ.भा.ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे प्रतिपादन शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांनी केले. तसेच पुढे बोलतांना सांगितले की, कधी कधी ग्राहकांची फसवणूक व पिळवणूक होते, त्यासाठी त्यांना नेमका कुठे व कोणाकडे न्याय मागावा हे कळत नाही. याकरीता आता भुसावळकरांना आजपासून त्यांच्या तक्रारी निवारणासाठी हक्काचे व्यासपीठ या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मिळाले आहे. आणि येथिल नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी महाजन यांनी केले. याचबरोबर, तालुका संघटक उज्वला बागुल व सचिव अँड जास्वंदी भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले.

ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे ठिकाणी व वेळ
यावेळी अँड कल्पना टेमाणी यांची नोटरीपदी नियुक्ती झाली म्हणून जिल्हा ग्राहक पंचायतीच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या मार्गदर्शन केंद्राचे कार्यालय महात्मा गांधी शॉपिंग कॉम्पलेक्स गाळा नं १५ दुसरा माळा जिल्हा व सञ न्यायालय समोर, भुसावळ येथे असून प्रत्येक शनिवार व रविवार रोजी सकाळी 10 ते 2 खुले राहिल.

कार्याक्रमाला उपस्थिती, सत्कार आणि प्ररिश्रम
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ तालुका ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा ॲड.कल्पना टेमानी होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भुसावळ संघटनेच्यावतीने तालुका संघटक उज्वला बागुल (पत्रकार), सचिव अँड जास्वंदी भंडारी व संघटनेच्या पादाधिकारी यांनी केले.

कार्यक्रमाला उपाध्यक्ष राजेश सैनी, सहकोषाध्यक्ष अँड निलेश भंडारी, सहसचिव अँड रमेश पांडव, सदस्य राजेश्री नेवे, आदेश सांगडे, अनमोल टेमाणी व इतर सभासद उपस्थित होते. यशस्वितेकरिता अ.भा.ग्राहक पंचायत संघटन भुसावळ पादाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन सचिव ॲड जास्वंदी भंडारी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका संघटक उज्वला बागुल यांनी केले.

Protected Content