भुसावळ येथे मध्यरात्री घरातून एलईडी टीव्हीची चोरी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील प्रभात कॉलनी या परिसरातून ५० हजार रुपये किमतीचा एलईडीटीव्ही चोरीस गेल्या प्रकरणी भुसावळ शहर  पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुबोध सिताराम सोये (वय-४९) रा. प्रभात कॉलनी सोमानी गार्डनजवळ भुसावळ हे खासगी काम करतात.  २२ मार्च रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील ५० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्हीचोरून नेला. हा प्रकार २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात सुबोध सोये यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ  सुरेश महाजन करीत आहे.

Protected Content