परमवीरसिंह यांच्या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर  ब्राष्टाचाराचे आरोप करून या आरोपांची  सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे .

 

मुख्य न्या दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली असून त्यावर उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती ऍड विक्रम नानकांनी यांनी दिली . पुरावे नष्ट करण्याच्या संशयामुळे अशा प्रयत्नांच्या आधी या भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी राज्य घटनेच्या २२६ व्य कलमानुसार झाली पाहिजे अशी मागणी करणारी ही जनहितावादी याचिका दाखल करण्यात आली आहे

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर  ब्राष्टाचाराचे आरोप करून या आरोपांची  सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका आधी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती सुप्रीम कोर्टाने  याचिका फेटाळत हाय कोर्टात जाण्याची सूचना बुधवारी परमवीर सिंह यांना केली होती प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकार यांच्या खटल्यात न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपली मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर केलेली बदलीही बेकायदेशीर असल्याचे परमवीर सिंह यांचे म्हणणे आहे पुरावे नष्ट केले जाण्याचे प्रयत्न होण्यापूर्वी  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानातील सिसिटीव्ही फुटेज चौकशीसाठी स्वतंत्नत्रपणे एखाद्या चौकशी  संस्थेने ताब्यात घ्यावे असे परमवीर सिंग यांनी या याचिकेत नमूद केले आहे .

 

 

Protected Content