बोदवड बाजार समितीच्या सभापतीपदी सुधीर तराळ यांची वर्णी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत एक हाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीने विजय संपादन केले आहे. शुक्रवारी १२ मे रोजी सभापती व उपसभापती निवडीसाठी आमदार एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे उपस्थितीत निवड करण्यात आली. यात सभापतीपदी अंतुर्ली येथील सुधीर तराळ तर उपसभापती पदासाठी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड झाली.

यावेळेस बाजार समिती विभाजनाविषयी आमदार एकनाथराव खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगले ताशेरे ओढले. आमदारांच्या दहशतीमुळे कोणीही अधिकारी बोदवडला येण्यास तयार नाही,तसेच स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांना ठेकेदारी करण्यामध्ये रस असून आमदार चंद्रकांत पाटील यांचा बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन करण्याचा प्रयत्न जरी असला तरी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा याला विरोध असल्याचे नाथाभाऊंनी सांगितले. तसेच बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला यावरच आमदार चंद्रकांत पाटील तोंडघशी पडल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

Protected Content