जळगावात पत्रकाराचा मोबाईलसह कॅमेरा लांबिवला; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सानेगुरूजी चौकात एका पत्रकाराचा ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व कॅमेरा अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना २९ मार्च रेाजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अल्ताफ इस्माईल शेख (वय-३०) रा. शेरा चौक, मेहरूण हे पत्रकार करून शहरात लॉकडाऊन असल्याने २९ मार्च रोजी शहरातील सानेगुरूजी चौकातील फ्रुट गल्लीत वळणावर व्हिडीओ शुटींग करत असतांना होंडा शाईन मोटारसायकलवर अज्ञात तिघांपैकी एकाने हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व कॅमेर लांबविला. याप्रकरणी अल्ताफ शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भीमराव नंदूरकर हे करीत आहे. 

Protected Content