चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील शेवरे बुद्रुक येथे कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून गंभीर जखमी केले. जखमीवस्थेत रूग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत केले. अडावद पोलीसांनी पतीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शेवरे बुद्रुक येथील रहिवाशी नारायण केऱ्या भिलाला (वय-४०) हा पत्नी गणुबाई भिलाला आणि मुलगा निलेश भिलाला यांच्यासह राहातात. नारायण यांना दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे घरात नेहमी वाद होत असतात. २९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता कौटुंबिक वादातून नारायण भिलाला यांनी संतापाच्या भरात पत्नी गणुबाई यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीने घाव घातले. यात त्या गंभीर जखमी झाले. जखमीवस्थेत मुलगा निलेश याने तातडीने उपजिल्हा रूग्णालयाने नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गुन्ह्यातील संशयित आरोपी नारायण भिलाला याला अडावद पोलीसांनी अटक केली आहे. निलेश भिलाला यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्याग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.