कल्याण-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघातात सहा जण जागीच ठार

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची एकत्रित धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

आज( बुधवारी) पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
पोलिसांनी या अपघातासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात ढवळपुरी फाट्या जवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर तातडीने जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content