७० लाखांची दारू असलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त

धाराशिव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धर्मापूरी येथून कोल्हापूरकडे ७० लाख रूपयांची दारू घेऊन जाणारा ट्रक पळवून नेल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड टोलनाक्याजवळ घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. हा ट्रक शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हा ट्रक व चोरीस गेलेल्या दारूचे १ हजार खोके पोलिसांनी धाराशिव जिल्हयातील वरूड येथून जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथील युनायटेड स्पिरिट कंपनीत तयार झालेली ७० लाख रुपयांची दारू घेवून एक ट्रक (एमएच २६ एडी ३५८६) हा शनिवारी (दि.११) सायंकाळी धर्मापुरी येथून कोल्हापूरला डिलिव्हरी देण्यासाठी निघाला होता. हा ट्रक चाकूर मार्गे लातूरहून पुढे कोल्हापूरच्या दिशेने जाणार होता. परंतु सदर ट्रक लातूर नांदेड महामार्गावरील आष्टामोड जवळील टोलनाक्यावर मध्यरात्री १२.३० वाजता आला असता एक बोलेरो कंपनीची कार अज्ञात आरोपींनी या ट्रकच्या समोर आडवी लावुन ट्रक थांबवला. ट्रक थांबवताच मागुन एक क्रिस्टा कंपनीची आनखी एक कार आली आणि दोन्ही कारमधून ७ ते ८ अज्ञात लोक खाली उर्वरित पान ४ हा ट्रक पळवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील दोन टोळ्यांनी सहभाग घेतला होता. परंतु सध्या यातील एकच आरोपी पोलिसांच्या गळाला लागला असुन अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Protected Content