कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एक ठार, दुसरा गंभीर जखमी

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड शहराजवळ मोठया अपघाताची घटना घडली आहे. या कार अपघातात एक तरूणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. ही घटना १५ मे रोजी बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, शिरूर कासार तालुक्यातील ‎‎नांदेवाली येथील नितीन मच्छिंद्र ‎थिटे हा‎ कल्याण जालिंदर थिटे याच्यासोबत कारने (एमएच १२‎पीक्यू ०९०१) बीड येथे आला ‎होता. दुपारी तो परत गावी जात ‎होता. कार भरधाव असल्याने बीड ‎‎शहराजवळील म्हसोबा फाटा ‎परिसरात चालकाचे कार वरील‎ नियंत्रण सुटल्याने भरधाव कार‎ पलटी झाली. या अपघातात नितीन ‎मच्छिंद्र थिटे याचा जागीच मृत्यू ‎झाला, तर कल्याण जालिंदर थिटे ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎हा गंभीर जखमी झाला. जिल्हा‎ रुग्णालयात जखमीला‎ उपचारासाठी दाखल केले होते.‎ मृत नितीन याचे शवविच्छेदन‎ जिल्हा रुग्णालयात केले गेले.

Protected Content