समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; ट्रकचालक ठार, क्लीनर जखमी

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृध्दी महामार्गावर टायर फूटल्याने त्यांचा वेग कमी झाला आणि मागून येणाऱ्या भरधाव ट्रक त्यावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात १५ मे रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास महामार्गावरील सोमठाणा शिवरात झाला. या अपघातातील चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनर गंभीर जखमी आहे. मृत चालक हा पश्चिम बंगालचा असून श्रीकांतालाल सरदार असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून खताच्या गोण्या घेऊन जात‎ असलेला ट्रक (सीजी १५ ईबी ९६८४) मुंबईकडून ‎नागपूरकडे जात होता. वाटेत या ट्रकचे पुढील टायर‎ फुटले. त्याच वेळी पाठीमागून भरधाव येणारा कांद्याच्या ‎गोण्या भरलेला ट्रक आदळून अपघात झाला. त्यात ‎पाठीमागील ट्रकचा चालक श्रीकांता लाल सरदार याचा‎जागीच मृत्यू झाला. त्याच्या सोबतचा क्लीनर चंदू सरदार हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची ‎माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी‎ तातडीने घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात नेले.‎ या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

Protected Content