नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिवस उत्साहात साजरा

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १६ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस निमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ इरेश पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले “समुदायच्या संपर्कात राहा व डेंग्यूला नियंत्रित करा” हे या वर्षाचे घोष वाक्य असून सर्वांनी परिषर स्वछ ठेवावा तसेच आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा त्या दिवशी घरातील सर्व पाणी साठे खाली करून स्वछ धुऊन कोरडे करावे जेणेकरून डासोतपत्ती ला आडा बसेल.
डेंग्यू च्या प्रसाराला नियंत्रित करण्यासाठी एडीस डासाची अंडी,अळी,कोष,व पूर्ण डास ही वाढ खंडीत केली तरच डेंग्यू आजाराचा प्रसार नियंत्रित करता येतो या बाबत सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्षेत्रात जनजागृती करावी असे आव्हान डॉ. इरेश पाटील यांनी केले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ तुषार देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शना खाली प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला त्या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. करिष्मा जैन तालुका हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन व आरोग्य कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

Protected Content