मुक्ताईनगर प्रतिनिधी । श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने एचआयव्ही एड्स प्रतिबंध मार्गदर्शन कार्यशाळा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच.ए. महाजन उपस्थित होते, तर कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक ज्योती गुरव समुपदेशिका- ग्रामीण रुग्णालय, वरणगाव उपस्थित होत्या.
या कार्यशाळेत एचआयव्ही एड्स संदर्भात समाजात असलेले समज आणि गैरसमज, एचआयव्ही होण्याचे प्रमुख कारणे व प्रतिबंधनात्मक उपाय या विविध विषयावर ज्योती गुरव यांनी विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला. तसेच “एड्स आजारावर प्रतिबंध हाच एकमात्र उपाय आहे” असे त्यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य एच. ए. महाजन यांनी आधुनिक काळात नवनवीन आजाराची निर्मिती होत आहे त्यामुळे एड्स सारख्या आजाराबद्दल आजच्या तरुण पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे. लैंगिक शिक्षणाचा व आरोग्याचा प्रसार आणि प्रचार हा शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. पी. पाटील तसेच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संजीव साळवे यांची विशेष उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यशाळेचे संयोजन एन. एस. एस. अधिकारी प्रा. विजय डांगे आणि प्रा. डॉ.दीपक बावस्कर यांनी केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभागाच्या क्रीडा संचालिका प्रा. डॉ.प्रतिभा ढाके, प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. सुरेखा चाटे तर आभार प्रदर्शन मानसशास्त्राच्या विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना महिला अधिकारी प्रा. डॉ. छाया ठिंगळे यांनी केले, तसेच तंत्र सहाय्य प्रा. डॉ.रंजना झिंजोरे व प्रा. सीमा राणे यांनी केले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.