संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुक्ताईनगर शहरांमध्ये संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी झाली. सावता माळी मंगल कार्यालय व सावता महाराज मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विशेष म्हणजे कुठलीही मिरवणूक न काढता कीर्तनाचा कार्यक्रम घेऊन संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी हे साजरी करण्यात आली. तसेच श्री गोकुळ रमेश माळी यांच्या सपत्नीक हस्ते पूजा अर्चना व आरती करण्यात आली. त्यानंतर मोठा भंडारा कार्यक्रम ठेवण्यात आला, याप्रसंगी माळी समाज बांधव व माळी पंचमंडळ तसेच माळी नवयुवक मंडळ यांची तर्फे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content