पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व शिवसेना-युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कोरोनामुक्त लसीकरण शिबिराला उत्फुर्स प्रतिसाद मिळाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाची तालुक्यात सर्वाधिक लसीकरण करण्यात आले.
आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाने, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याने व प्रथिमिक आरोग्य केंद्र, शिवसेना – युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या लसीकरण शिबिराला उत्फुर्स प्रतिसाद लाभला असून २ हजार ४७८ नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला आहे. यातून शिवसेनेने आपल्या समाजमिभूख कार्याचा पुन्हा एकदा प्रत्यय गावपुढे ठेवला आहे. यावेळी विजय चौधरी यांना लसीकरणाची पहिली संधी देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनामुक्त समाजासाठी लसीकरण करण्याचा शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. मात्र शासनाच्या कुठल्याही योजनेत एखादी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ता सहभागी होतो तेव्हा असा उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यात अधिक बळ मिळते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील मनोगत व्यक्त करीत असतांना म्हणाले की, लसीकरण करणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असून आपल्या परिवाराला आर्थिक संकटात जाण्यापासून रोखणारे देखील आहे. कोरोनामुळे अनेक परिवार निराधार झाले असून आर्थिक परिस्थिती ने उध्वस्त झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या लसीकरनाचा लाभ घ्यावा असे सांगितले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र पाटील, डॉ.योगेश बसेर, डॉ. शीतल सोमवंशी यांच्यासह आरोग्य सेवक, सेविका, नर्स, आशा स्वयंसेविका, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश कुडे, कृष्णा सोनार, सुनील महाजन, सागर पाटील, भैया महाजन, कन्हैया परदेशी, रवींद्र पाटील, सोनू परदेशी, वसीम शेख, विनोद परदेशी, नूरबेग मिर्झा, हर्षवर्धन पाटील, उमेश लढे, रोशन जाधव, धनराज चौधरी, गोरख महाजन, जितेंद्र परदेशी, कडू पाटील, संदीप पाटील, इंद्रनील भामरे, नाना महाजन, योगेश जाधव, विश्वनाथ निकुंभ, सागर जाधव, विकी जाधव, आबा महाजन, सुनील शिंपी, अंजली चौहान, मंगेश राजपूत, अनिल तावडे यांनी सहकार्य केले. यावेळी पोलीस दुरक्षेत्र नगरदेवळा यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.