स्पर्धा परिक्षेत उत्‍तीर्ण होण्यासाठी वेळेचे नियोजन करा – कैलास गांधारे

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजच्या स्पर्धा परिक्षेच्या युगात सुरू असलेल्या कठीण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कसे टिकून रहावे, त्यासाठी त्यांनी वेळेचे नियोजन करावे, असे जिल्हा रुग्णालय खामगावचे ओ.टी. स्टाफ कैलास गांधारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

 

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव मध्ये लेक्‍चर हॉलमध्ये मंगळवारी सकाळी १० वाजता नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी विद्याथ्यार्र्ंना मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात तसेच बाहेरील ज्या विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात त्याची तयारी कशी करावी, वेळेचे नियोजन कसे करावे आदिबद्दल सांगितले.

 

मा. कैलास गांधारे हे एक शासकीय कर्मचारी आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व दूर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ या होत्या. तसेच सहा. प्राध्यापक मनोरमा कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपप्राचार्या प्रा. विशाखा वाघ, सहा. प्राध्यापक मनोरमा कश्यप, सहा. प्रा. रश्मी टेंभुर्णे, प्रा.अस्मिता, प्रीती, शिल्पा, एकता, कोमल, प्रणाली, रिध्दी आदी उपस्थित होते.

Protected Content