जळगावात भाजप आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांसोबत आ.भोळे यांची बैठक

BJP News

जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपा महानगरतर्फे विविध पाच आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील जी.एम.फाऊंडेशन या कार्यालयात झाली. आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील होते. बैठकीस महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी दर्शन करून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी ओ.बी.सी मोर्चा, एससी आघाडी एनटी जमात आघाडी, कामगार आघाडी, व्हीजीएनटी आघाडी या पाच आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विष्णू भंगाळेंनी घेतली आ. भोळेंची भेट
दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहे. त्यांनी शुक्रवारी माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या निवासस्थानी जाऊन सिवस्तर चर्चा केली. यावेळी ललित चौधरी, सचिन नारळे, सुनिल भंगाळे, भाईजी मुंदडा, अनिला झवर, नगरसेवक विशाल त्रिपाटी आदी उपस्थित होते.

आज दुपारी बैठक
भाजपा महानगर प्रसिध्दी व सोशल मीडिया प्रमखांची बैठक आज 5 रोजी दुपारी शहरातील जी.एम.फाऊंडेशन येथे महायुतीचे उमेदवारी राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत महायुतीतील भाजपा, शिवसेना, रिवाई यांच्यासह युतीचे मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यक्रर्ते यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले आहे.

Protected Content