मीटर बदलावरून धरणगावात तणाव ; भाजप तालुकाध्यक्षांच्या दणक्यानंतर महावितरणचे अधिकारी परतले

sanjay mahajan1

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शेतकरी बहुल परिसर असलेल्या मोठा माळीवाडा भागात कुठलीही पूर्व सूचना न देता अचानक वीज मीटर बदलविण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या चांगल्याच रोषाला समोर जावे लागले. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत उर्मट भाषा वापरल्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन यांनी त्यांना चांगलेच खडसावले. श्री.महाजन यांची आक्रमक भूमिका बघता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुमान माघारी परतले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.

 

 

या संदर्भात संजय महाजन यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले की, सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. अशा परीस्थित देखील मागील दोन महिन्यांपूर्वी धरणगावात मीटर बसवण्याचे काम महावितरणने केले . त्यांचे म्हणणे होते की,जुने मीटर (Electro Magnetic) मीटर बंद झाले आहेत. ते मीटर आता चालत नाही, नवीन मीटर बसवावे लागतील. त्यावेळेस सर्व महावितरण कर्मचाऱ्यांना व अभियंताना धरणगावकरांनी मीटर बदली करण्यास पूर्ण सहकार्य केले. या गोष्टीला अवघे काही दिवस होत नाही तोच आज पुन्हा परत मीटर बद्दलवण्याचे काम सुरू झाले. दोन महिन्यांपूर्वीचे मीटर अवघे 200 युनिटच्या पुढे जात नाही तोच,पुन्हा कसे मीटर बदलवले जाऊ शकतात? असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला.

 

 

महावितरणचे अधिकारी आता म्हणताय की, आता मीटरची रिडींग ऑनलाइन होणार असून हे मीटर बदलावेच लागतील. परंतु या मीटर बदलाच्या घोळात कॉन्ट्रॅक्टर कडून टक्केवारी खाण्याचा प्रकार असल्याचा आरोप देखील श्री. महाजन यांनी लावला आहे. तर Genious नावाचे नवीन मीटरवर नुसता मोबाईल चार्जिंग केला तरी, दिवसाला 1 युनिट फिरत आहे. दुसरीकडे दोन महिन्यापूर्वी मीटर बदलवलेले असतांना देखील लोकांना जुन्याच मीटरचे बिल येत आहेत. या संदर्भात महावितरणच्या ऑफिसला तक्रार केली तर फिरवा फिरव करतात. महावितरणचे अधिकारी त्यांचे खिसे भरण्यासाठी गरिबांना कापायला बसली आहे.

 

 

श्री. महाजन यांनी मागील दोन तीन महिन्यापूर्वी महावितरणने मीटर बद्दलवले ते मीटर 50 टक्के लोकांचे का फास्ट निघाले.?, तुमचा कंपनी कडून जर ते चेक करून निघतात तर ते फास्ट कसे काय?. आता जे मीटर बदलवताय ते फास्ट निघणार नाही याची काय खात्री?, मीटर जर चांगले असेल लोकांनी का म्हणून बदलावे?, मागील 3 महिन्यापूर्वी गावातले मीटर किती बदलवले ? आणि कॉन्ट्रॅक्टरला ते बदलवण्याचा किती लाखात कॉन्ट्रॅक्ट दिला? तसेच जुने मीटर आता किती शिल्लक आहेत?, आता जे Genious कंपनी चे मीटर बसवलेय त्याचा कॉन्ट्रॅक्ट किती लाखात दिला आहे? आता जे Genious मीटर बसवत आहे त्याचा कालावधी किती वर्ष? आणि ते मीटर फास्ट झाल्यास याला जबाबदार कोण ? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करताच महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. दरम्यान, श्री.महाजन यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महिला,पुरुष असा शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला. परंतु महाजन यांनी सर्वांची समजूत काढत महावितरणच्या अधिकारी व कर्मचारींना परतवून लावले.

Add Comment

Protected Content