Home Cities धरणगाव धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे निधन

धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे निधन

0
169


salim patel

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम अब्बामियाँ पटेल (वय ४८) यांचे आज (दि.११ ऑगस्ट) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी २.०० च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

 

सलीम पटेल हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सध्या ते शिवसेनेकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नगराध्यक्ष होण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. तसेच मुस्लीम समाजाचे ते धरणगावचे अध्यक्षही होते. गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ते धरणगाव नगर पालिकेच्या राजकारणात सक्रीय होते. त्यांच्या पश्चात वडील, मोठे भाऊ, पत्नी, दोन मुले व सुना असा परिवार आहे.


Protected Content

Play sound