बोरगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्या अपात्र : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामसेवक शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्या म्हणून पुढे राहण्यास अपात्र घोषित करण्यात आलं आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, अशोक धोंडू मराठे यांनी वरील प्रकरणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या नावाने तक्रार अर्ज केला होता. तो मंजूर करत दिलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली.

प्रस्तुत प्रकरणी गुरुवार, दि. २ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या वतीने काढलेल्या निकालाच्या सूचना पत्रात धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्या मिराबाई शिवाजी पवार यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे शुभांगी भारदे उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने आदेशाच्या दिनांकापासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४-ज-३ नुसार ग्रामपंचायत सदस्या म्हणून पुढे राहण्यास अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश पारित करण्यात येत आहे. उपजिल्हा अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे

Protected Content