Home क्राईम अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याची पालकांची तक्रार

अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याची पालकांची तक्रार

0
111
crime-2

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मयुर कॉलनीत राहणारा 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी दिली. याप्रकरणी मुलाच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक गोकुळसिंग राजपूत (वय-40) रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा व्यसनमुक्ती केंद्राजवळ हे सेक्यूरीटीचे काम करतात. 18 जून रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास उठून ते आंघोळ करून बाहेर आल्यानंतर त्यांचा मुलगा जयेश राजपूत हा घरात दिसून आला नाही. त्याची नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली मात्र जयेश मिळून आला नाही. त्याच्या सोबत त्याने शाळेचे दप्तर आणि दोन ड्रेस सोबत नेले आहे. अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर अशोक राजपूत यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound