कायद्याचे उल्लंघन: आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिके समोर विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या १६ ते १८ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कर्नाटक येथील भाजपा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ हटवून शिवरायांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट रोजी जळगाव महानगरपालिकेसमोर विना परवाना आंदोलन कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेने महानगरप्रमुख शरद तायडे, दिनेश जगताप, गणेश गायकवाड, ईश्वर राजपूत, जाकीर पठाण, नितीनी सपके, हेमंत महाजन, पुनम राजपूत, ज्योती शिवदे, सारीका माळी यांच्यासह ८ ते १० जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात पो.कॉ. कमलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content