शतपावली करतांना एकाचा मोबाइल लांबविला; अज्ञात दोन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शतपावली करत जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून दोन जणांनी मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढल्याचा प्रकार गणेश कॉलनी परिसरात रात्री घडलाय. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय.

अधिक माहिती अशी की, नागेश अन्नाप्पा खेडगी (वय-४०, रा. वासूदेव पार्क, १०० फुटी रोड, कोल्हे नगर) हे रोज रात्री शतपावली करण्यासाठी जातात. काल २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शहरातील गणेश कॉलनी परिसरातील महावीर क्लासेस व कन्या शाळेच्या दरम्यानच्या रोडवरून जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून त्यांच्या हातातील १३ हजार ९०० रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. नागेश खेडगी यांनी तत्काळ आरडाओरड केली. त्यावेळी महाविर क्लासेस जवळ असलेल्या एका तरूणाने चोरट्यांचा दुचाकीने पाठलाग केला. दरम्यान रोज गार्डनकडून मधल्यारस्त्याने ते पसार झाले होते. नागेश खेडगी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती सांगितले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कल्याण कासार करीत आहे.

Protected Content