फ़ैजपूर विभागातील तलाठ्यांच्या बदल्या

 

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । । रावेर व यावल तालुक्यातील तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश फ़ैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी काढले आहेत.

सावदा येथील तलाठी मीना बहादूर तडवी यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या जागी सांगवी बृद्रुकचे तलाठी एस. के. पाटील यांची बदली करण्यात आली आहे. कोचूरचे श्रीहरी दगडू कांबळे यांच्या जागी विरावली येथील तलाठी एस. जी. बाबर यांची बदली करण्यात आली आहे. एस. जी. बाबर यांच्या जागी रायपूर तलाठी एच. व्ही. मारूळे यांची बदली करण्यात आली आहे.

अंजाळे ता. यावल येथील तलाठी निखिल मिसाळ यांची यावल शहर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी यावलचे तलाठी शरद सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली आहे.सावखेडा ब्रुद्रुकचे तलाठी अजय महाजन यांची बदली उटखेडा येथे झाल्याने त्यांच्या रिक्त जागी सावखेडा ब्रुद्रुकचे निलेश चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. सांगवी बुद्रुकचे एस. के. पाटील यांची बदली सावदा येथे झाल्याने त्यांच्या जागी उटखेडा येथील श्रीमती एच. व्ही. वाघ यांची बदली करण्यात आली आहे.

कोचूरचे श्रीहरी कांबळे यांची बदली रायपूर येथे एच. व्ही. मारुळे यांच्या जागी करण्यात आली आहे. ह्या बदल्या प्रशासकीय सोईच्या दृष्टीने करण्यात आल्या आहेत. ह्या बदल्या फ़ैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केल्या आहेत.

Protected Content