छ. शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ छत्रपती क्रांती सेनेतर्फे निवेदन

 

धरणगाव, प्रतिनिधी । येथील तहसिल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ छत्रपती क्रांती सेनेतर्फे निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , स्वतःला स्टँडअप कॉमेडीयन म्हणवून घेणारे , सडक्या मानसिकतेचे आणि मनुवादी प्रवृत्ती असलेले अग्रिमा जोशुआ व सौरव घोष या दोन्ही विकृत विदूषकांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत जागतिक कीर्तीचे महान राजे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत सांगायचे झाले तर ‘राजांचं राजपण – आजपण अन उद्यापण’ , अशी महाराजांची ख्याती आहे. असे असतांना ज्यांचं स्वतःच काहीच अस्तित्व नाही , ५०० रुपयांसाठी आपल्या आई – वडिलांचा उद्धार करायला मागेपुढे न पाहणाऱ्या किरकोळ मानसिकता असलेल्या विकृत लोकांनी शिवरायांच्या बाबतीत चुकीचं व संतापजनक वक्तव्य केल्यामुळे सामाजिक वातावरण कलुषित होत आहे. अशा प्रकारचे वक्तव्य जाणीवपूर्वक करून महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन छत्रपती क्रांती सेना , महात्मा फुले क्रांती युवा मंच , महात्मा फुले ब्रिगेड , बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीने तहसिलदार , धरणगाव यांना देण्यात आले. तहसिलच्यावतीने श्री. साळी निवेदन स्विकारले.

यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , महात्मा फुले क्रांती युवा मंचचे अध्यक्ष आर. डी. महाजन , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र ( आबा ) वाघ , बामसेफ चे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील , बामसेफचे तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी, महात्मा फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष राजेंद्र महाजन , माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी, भा. रा. काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष चंदन पाटील , नगरसेवक गुलाब मराठे , राजे प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष वैभव पाटील , मीडिया प्रमुख ललित पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार , प्रा. आर. एन. भदाणे , जगदंबा टेंट चे संचालक जितेंद्र पाटील ( महाराज ) , आकाश बिवाल , आनंद पाटील , विकास लांबोळे , महेश पाटील, नरेंद्र पाटील , पंकज पाटील , राहुल मराठे , हेमू चौधरी , प्रफुल्ल पवार , किशोर मराठे , नामदेव मराठे , गौतम गजरे, निलेश पवार , विश्वास पाटील , रविंद्र गजरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.