भुसावळात लॉकडाऊन वाढणार नाही- जिल्हाधिकारी ( व्हिडीओ )

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । आज सक्तीच्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असून यापुढे अजून लॉकडाऊन वाढणार नसून नियमांसह अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. यामुळे लॉकडाऊनवरून सुरू असणारा संशयकल्लोळ संपुष्टात आला आहे.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57

भुसावळ शहरात आज रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या दालनात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत भुसावळ शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यावर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संशयीतांचा शोध घेऊन त्यांचे तात्काळ स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तसेच कोरोनाबाधीतांचे अहवाल सुद्धा तात्काळ उपलब्ध होत असल्याने त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.अहवाल लवकर प्राप्त होत असल्यामुळे रूग्णांवर उपचार करणे सोपे होत आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना घरी कसे पाठवता येईल आणि रुग्णांची संख्या शून्यावर कशी आणता येईल यासंबंधी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला असून कोरोनाने बरे होणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. तसेच भुसावळ शहरातील लॉकडाऊन वाढणार नसून कोणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. तरीही नागरिकांनी मास्क लावून दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी आज व्यक्त केले आहेत. दरम्यान, ट्रामा केअर सेंटरला देखील जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.आजच्या बैठकीला आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक देवरे व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!