चिअर्स… मद्याचे गोडावून फोडले !

देशी विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या बॉक्स लांबविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एसी.पी.वाईन शॉपचे गोडावून चोरट्यांनी फोडून तब्बल ७ लाख ४९ हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी दारून चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एस.पी.वाईन शॉप दुकानाच्या मागे असलेल्या लहान गोडावूनचे वरच्या पत्र्याला असलेले व्हॅन्टीलेशन फॅन उचकावून चोरट्यांनी देशी, विदेशी दारूच्या सीलबंद असलेले बॉक्स असे एकुण ७ लाख ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, एस.पी.वाईन शॉपचे व्यवस्थापक भुषण जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी २८ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.

Protected Content