चोपड्याजवळ मालवाहू वाहन पलटी; एक ठार, 18 जखमी

3ba82947 79e3 4fbf 8216 2ad664203752

 

चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या काजीपुरा फाट्यापुढे आज सकाळी मालवाहू वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १८ मजूर जखमी झाले आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास मालवाहू गाडी 30 ते 35 मजूरांना घेवून अडावदहून शिरपूरकडे जात असताना अचानक पलटी झाली. या अपघातात समोरून येणाऱ्या मोटार सायकलस्वारचा मृत्यु झाला. तर मालवाहू गाडीतील १८ जण जखमी झालेत. जखमींमध्ये अझोरुद्दीन हमीद तडवी(वय 18),इर्शाद दमीद तडवी(वय 19), नूरजहाँन हमीद तडवी (वय 48), हमीदाबी रमजान तडवी (वय 45),सिमरन सुपडू तडवी (वय 14), राजू सिकंदर तडवी (वय 22) , हमीदा रमजान तडवी ( वय42), खातूनबी रहेमान तडवी (वय 60) ,बतूलबी सुमान तडवी (वय 45), लुकमान अरमान तडवी (वय 25) ,हमीदा नत्थु तडवी( वय 34), साहिल सुपडू तडवी ( वय 18) , मेहमूदाबी नथ्थु तडवी (वय 40), एनूरबी कलिंदर तडवी (वय 50), शाहिद शरद तडवी (वय 19), शेखर गंभीर तडवी (वय 23) , खातूनबी सायबू तडवी (वय 50), (सर्व राहणार अडावद ता.यावल) तसेच गोपाल दगडू महाजन (वय 25 रा. किनगाव)यांचा समावेश आहे.दरम्यान, मोटारसायकलवरील मयत तरुणाचे नाव समजू शकले नाही.

Add Comment

Protected Content