जळगांव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दिवंगत खेळाडूंच्या स्मरणार्थ आयोजित अकराव्या मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यजमान जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनने मिळविले. तर भुसावळचा वाय. सी. सी. संघ उपविजयी राहिला.
एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेचे उद्घाटन आ.राजुमामा भोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य ऍड. केतन ढाके, जेष्ठ खेळाडू सलीम खान, अनिल सोनवणे, माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू बन्सी अप्पा माळी, मातोश्री फायनान्स चे अभिजित पाटील, प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, माजी सिनेट सदस्य शब्बीर सय्यद आदी उपस्थित होते.
पहिला उपांत्य सामना अजय जिमखाना आणि शहर व तालुका संघात चुरशीने खेळला गेला. यांत एक चेंडू शिल्लक असतांना शहर व तालुका संघाने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भुसावळ वाय. सी. सी. संघाने अमळनेर इलेव्हन संघाला पराभूत केले.
अंतिम सामन्यात शहर व तालुका संघाने उपविजयी भुसावळ वाय. सी. सी. संघाचा वीस धावांनी पराभव करून विजेतेपद मिळविले.या विजयी संघाचा प्रमोद बडगुजर सामनावीर ठरला. उत्कृष्ट गोलंदाज परेश बोरकर, उत्कृष्ट फलंदाज शेखर पोळ (दोन्ही अजय जिमखाना) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजु भोई, मालिकावीर संजय पाटील (दोन्ही भुसावळ),फेयर प्ले पुरस्कार अमळनेर इलेव्हन संघाला मिळाला. स्व. खेळाडू आदिल खान यांच्या स्मरणार्थ सलीम खान यांचे तर्फे सर्व पारितोषिक देण्यात आली. यावेळी आयोजक असोसिएशनचे अध्यक्ष राजु खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी, सचिव ऍड. केतन ढाके, कोषाध्यक्ष बाबा शिर्के, ऍड. नितीन देवराज आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन युवराज वाघ यांनी केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी किरण चौधरी, नितीन पाटील, ज्ञानेश्वर कोळी, राकेश भालेराव, केतन अहिरराव, राहुल चौधरी यांनी परिश्रम घेतले. समालोचन उमाकांत बाऊसकर, गजानन देशमुख यांनी केले.