भीषण अपघातात पेट्रोल टँकर चालकाचा मृत्यू;

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अज्ञात वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील बसस्थानकासमोर शनिवार ३० डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळाले.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मण माणिक वाडले (वय-५२, रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव) हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. टँकरवर चालक म्हणून ते काम करत होते. दरम्यान, शनिवार ३० डिसेंबर रोजी वराड बुद्रुक गावातील बसस्थानकासमोरून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात असताना त्यांचा ताबा सुटला आणि ट्रक थेट नाल्यावरील पुलावरील कठड्यावर धडकली. या अपघातात चालक लक्ष्मण वाडले हे गंभीररित्या जखमी झाले. यावेळी अपघात घडताच गावातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मृत घोषित केले.

Protected Content