जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील साई नगर येथे आलेले पाहुणे पाहण्यासाठी गेलेल्या सुप्रिम कॉलनीतील तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत अजय भास्कर विश्वे वय २९ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी पाहूणे आलेले होते. त्यावेळी आलेले पाहूणे हे मन्यारखेडा येथील सोपान राजपूत आणि सपना सोपान राजपूत दोन्ही रा. साईनगर, मन्यारखेडा शिवार, जळगाव यांच्याकडे गेले. रात्री १०.३० वाजेच्या सुमार अजय विश्वे हा आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी सोपान राजपूत यांच्याघरी गेले. याचा राग आल्याने सोपान राजपूत आणि सपना राजपूत या दोघांनी अजयला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी अजय विश्वे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील हे करीत आहे.