भरधाव ॲपे रिक्षाच्या धडकेत दोन महिला जखमी; रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील बसस्थानकासमोरून पायी जाणाऱ्या दोन महिलांना भरधाव वेगात आलेल्या ॲपेरिक्षाने धडक दिली. या धडकेत दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बसस्थानकाजवळ बुधवार ८ जून रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी ॲपेरिक्षा क्रमांक (एमएच १९ सीवी ४७१६) ने पायी जाणाऱ्या रंजना राजू धनगर (वय-४०) आणि चंद्राबाई रमेश बारेला दोन्ही रा. भवानी नगर नशिराबाद ता.जि.जळगाव यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्या दोन्ही महिलांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रंजना धनगर यांच्या फिर्यादीवरून गुरूवार ९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ॲपे रिक्षा चालक योगेश राजेश रायचंदे रा. शिरसोली ता.जि.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content