भरधाव लक्झरी बसला धडक; बस चालक किरकोळ जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरव समोर भरधाव लक्झरीची महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. यात बसचालक किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी लक्झरी चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव आगाराची बस क्रमांक (एमएच १३ सीयू ७४९६) जळगावहून भूसावळकडे जात असतांना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरवजवळ मागून  भरधाव वेगाने जाणारी लक्झरी बस क्रमांक (जीजे ५ झेड ७१०७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत बस चालक अशोक कृष्णा पवार रा. पिंप्री ता. धरणगाव हे किरकोळ जखमी झाले. जिल्हा शासकीय रूग्णालयात प्राथमोपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी ९ जून रोजी सकाळी ९ वाजता लक्झरी चालक सत्यवान मच्छिंद्र सोनवणे रा. जयजवान सोसायटी, मोहाडी ता.जि.धुळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!