आ. मंगेश चव्हाणांच्या प्रयत्नांनी गिरणा-मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी गेल्या अनेक वर्षांची मागणी असणार्‍या व मन्याड खोर्‍यातील २५ गावांना संजीवनी ठरणार्‍या गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आज जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे सदर सर्वेक्षणाची मागणी केली होती,  त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले असता जलसंपदा विभागाच्या वतीने तातडीने हे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली झाल्या.

प्राथमिक सर्वेक्षणात गिरणा धरणातून नैसर्गिक प्रवाहाने मन्याड धरणात पाणी आणणे शक्य असल्याचा निष्कर्ष जलसंपदा विभागाचे अभियंता यांनी काढला आहे. यामुळे एक सकारात्मक पाऊल नदीजोड च्या दिशेने पडले आहे.

सदर सर्वेक्षणात जलसंपदा विभागाच्या स्थापत्य शाखेचे उपअभियंता अश्वजित बच्छाव व कनिष्ठ अभियंता क्षितिज चौधरी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र शिवराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अप्पा पाटील, नाना पाटील, चेतन पाटील आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गिरणा धरण हे मन्याड पेक्षा २८ मीटर उंच आहे. त्यामुळे मन्याड धरणात नैसर्गिक प्रवाहाने पाणी येणे शक्य आहे. गिरणा धरणाच्या रोहिणी व डोणदिगर १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जॅकवेल जवळील जागा व मन्याड धरणाच्या डाव्या बाजूला नांदगाव रोड जवळील जागा याचे अंतर जवळपास ८ किमी आहे. प्राथमिक सर्वेक्षण अहवाल दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या वतीने डिटेल सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Protected Content