चाळीसगावात शिक्षकाच्या घरात चोरी ; लाखांचे ऐवज लंपास

चाळीसगाव, प्रतिनिधी   चुलत बहिणीच्या लग्नासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरातील लोखंडी कपाटातून सोन्याच्या दागिन्यासह २ लाख १० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील गणेश कॉलनीत घडली असून याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विकास लहू बोरसे (वय- ४३ रा. गणेश कॉलनी, भडगाव रोड, ता. चाळीसगाव)‌ वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शहरातील साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चुलत बहिणीच्या लग्नाचा कार्यक्रम धुळे येथे असल्याने बोरसे हे घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह दि. ३ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास गेले होते. दरम्यान, लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बोरसे परिवार हे शनिवार, ५ रोजी सकाळी ८:३० वाजता घरी परतल्यावर कुलूप तोडून घराची कडी ‌लावलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यावर बोरसे यांनी घरात जाऊन पाहणी केली असता लोखंडी कपाटातून ४० हजार किंमतीची २० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ४४ हजार किंमतीची २२ ग्रॅमची पोत, ३० हजार किंमतीची १५ ग्रॅम वजनाचे गोफ, १० हजार किंमतीची १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १२ हजार किंमतीच्या ६ ग्रॅम वजनाचे कानातले टोंगल, ४ हजार किंमतीचे २ ग्रॅमचे ओमपान, ६० हजार रोकडं व १० हजार किंमतीचे एक डेल कंपनीचा काळ्या रंगाचा लॅपटॉप असे एकूण २,१०,००० हजार रुपयांचे मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरून नेला. हे स्पष्ट होताच विकास बोरसे यांनी लागलीच शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ४५४, ४५७, ३८० अशा विविध कलमान्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.

 

Protected Content