औरंगाबाद (वृत्तसंस्था) महायुतीच्या नावाखाली मते घेतली आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने फसवणूक झाली. या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांची नावे आहेत. औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात भीमराव चौरे यांनी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महायुतीच्या नावाखाली मते घेतली, पण काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन शिवसेना आमची फसवणूक करत असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे यांनी केली आहे.