महामार्गावर दुचाकी आदळल्याने महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद फाट्याजवळील महामार्गावर अंधाऱ्या खडीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिला हिरामण राठोड (वय-५१) रा. फॉरेस्ट कॉलनी, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिला राठोड या फॉरेस्ट कॉलनी येथे कुटुंबासह वास्तव्यास होत्या. मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी त्याचा मुलगा तुषार हिरामण राठोड (वय-२३) यांच्यासोबत दुचाकीने खासगी कामानिमित्त भुसावळ येथे गेल्या होत्या. काम आटोपून दोन्ही माय-लेक हे जळगावला परतण्यासाठी दुचाकीने निघाले होते. तरसोद गावाजवळील महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आजू-बाजूला खडी व मातीचे ढिगार आहे. राठोड यांची दुचाकी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक या खडी व मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. या दोन्ही माय-लेक फेकले गेले. शिला राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा तुषारा राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता. यावेळी नातेवाइकांची प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content